दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा lyrics Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
दत्तगुरुंचे नाम स्मरा हो दत्तगुरुंचे भजन करा ॥
हे नामामृत भवभय हारक । अघसंहारक त्रिभुवन तारक ।
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया । अमोल ठेवा हाती धरा ॥१॥
दत्तचरण माहेर सुखाचे । दत्तभजन भोजन मोक्षाचे ॥
कवच लाभता दत्तकृपेचे । कळी-काळाचे भय न धरा ॥२॥
हा उत्पत्ति स्थिती लय कर्ता । योग ज्ञान उदगाता त्राता ॥
दत्त चरित मधु गाता गाता । भव सागर हा पार करा ॥३॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥